Friday, 10 June 2016

सोया बिन -हेल्थ भी वेल्थ भी

भारत हा जगातला एकमेव शाकाहारी देश आहे . शाकाहारी व्यक्तींना आपल्या प्रथीनां च्या गरजेसाठी दुध  व डाळी वर अवलंबून राहावे लागते . तशात मांस जन्य पदार्थाचे भाव  व  त्यातील कॉलेस्त्रोल यामुळे मांसाहारी व्यक्तींना सुद्धा रोजच्या आहारात प्रथीनांसाठी डाळीवर अवलंबून राहावे लागते . मागणी मोठी आणि पुरवठा अपुरा यामुळे डाळीच्या भावा मध्ये वादळे येतात . रास्त दारात पौष्टिक आहार हि आपणा सर्वांची प्राथमिक गरज आहे .
आपण डाळींचा प्रश्न शास्त्रोक्त पद्धतीने मुळापासून सोडवला पाहीजे . गेली अनेक दशके आपण डाळी आयात करतो .आपण कॅनडा ,ऑस्ट्रेलिया अशा श्रीमंत देशातल्या श्रीमंत शेतकऱ्यांना जणू काही हमीभाव देत आहोत.
१ टन डाळ आयात करणे म्हणजे एका शेतकरी कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न हिरावून घेणे आपण असे दर साल लाखो टन डाळी आयात करतो .
विचार करण्या सारखी बाब अशी कि सोयाबीन हे डाळ वर्गीय धान्य आहे आणि आपण त्याचा उपयोग तेलबिया म्हणून करतो . कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक असणार्या मोठ मोठ्या कंपन्यामध्ये  सोयाबीन चे तेल काढले जाते .

सोयाबीन मध्ये १८ टक्के तेल तर ४० टक्के प्रथिने असतात . गिरण्यांमध्ये तेलाबरोबर मिळणारी पेंड आपण कोंबडी खाद्य म्हणुन वापरतो .या उलट चीन ,जपान या देशांमध्ये गेली शेकडो वर्षे परंपरेने सोयाबीन रोजच्या आहारात खाल्ले जाते .

१९३० मध्ये महात्मा गांधींनी सोय बिन ला सोन्याचा दाणा म्हणजे गोल्डन सिड म्हटले होते .

सोय संघाच्या माध्यमातून आम्ही गृह उद्योगात सोयाबीन चे दुध व त्यावर आधारित अनेक खाद्य पदार्थ करायला शिकवतो . त्यामुळे लक्षात आले कि सोयाबीन  चा कडवट पणा त्याच्या सालीत असतो . म्हणून आम्ही गृह उद्योगात सोयाबीन ची डाळ करण्याचे यंत्र वीकासित केले . मात्र सोय बिन ची डाळ शिजायला वेळ लागतो .

या अनुभवातून आम्ही आता सोयाबीन ,मका गहू व हळद एकत्र करून रेडी टू इट  स्वरूपातील डाळ विवा फूड्स ब्रान्ड ने बाजारात आणत आहोत . हे डाळ धुण्याची गरज नाही . कुकरच्या एका शिट्टी मध्ये शिजते त्यामुळे गेस ची बचत होते . या रेडी टू इट डाळी मध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगलेच जास्त आहे .डाळ खाल्या वर पोटात जळ जळ होत नाही . हि डाळ वापरून बाकी बरेच पदार्थ करता येतात व इतर डाळी बरोबर पण वापरता येते  आणि स्वस्त हि आहे .

एवढे सगळे गुण असणारी डाळ लोकप्रिय होणार यात शंका नाही . तरी सुद्धा एक जागा वेगळा मुद्दा शिल्लक राहतोच . गृहिणींनी ,बचत गटांनी ,उद्योजाकानी स्वतः सेवन करून अपल्या मित्र मंडळींना word of mouth
प्रकारच्या पब्ली सिटी ने विकण्यातून हेल्थ भी वेल्थ भी मिळवावी .
ई-मार्केटिंग च्या माध्यामतून आम्ही हि आरोग्यादाई डाळ लोकां पर्यंत पोहोचवत आहोत .


पद्माकर देशपांडे
९३२५००६२९१
पुणे



No comments:

Post a Comment