हुशार विद्यार्थी कृषी क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण आजही तुलनेने कमी असल्यामुळे आपल्याकडे कृषी क्षेत्रात ज्ञानाची गुंतवणूक हवी तितक्या प्रमाणात झालेली दिसत नाहीत. अनेक जण इंजिनिअरिंगची पदवी-पदविका घेतात, पण चांगली नोकरी मिळत नाही याचे शल्य त्यांना बोचत असते. अशा वेळेस कृषीयांत्रिकी क्षेत्राची माहिती घेणे योग्य ठरते.
घरी, बागेत, शेतात गरज असणाऱ्या यंत्रांची उपकरणांची माहिती घेणे, कॉलेजात शिकतानाच योग्य प्रकल्प निवडून यंत्रे, उपकरणे विकसित करण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा आणि नंतर जग जिंकायला सज्ज व्हावे. नारायण मूर्तीच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘सगळे जग तुमची वाट पाहात आहे, तुम्ही कशाची वाट पाहात आहात?’
आयटीच्या क्षेत्रासाठी लागणारे वेळेचे महत्त्व आपण समजून घेतो. आपण समजून घेत नाही ती बाब म्हणजे शेतीमध्येसुद्धा वेळेला महत्त्व असते. पाऊस पडल्यावर दु:खाचा किंवा समस्यांचा कितीही डोंगर उभा राहिला तरी शेतकरी ते बाजूला ठेवून प्रथम पेरणी करतो, याचे कारण हवामान बदलले की पीक हुकलेच, म्हणून समजा. तीच गोष्ट बाजारपेठेची. बाजारपेठेत वेळेवर शेतमाल पोहोचला नाही, चांगल्या स्थितीत माल पोहोचवला नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. शेतातली नांगरणी, कोळपणी, फवारणी, तोडणी आणि तोडणीनंतर साठवणी व प्रक्रिया याबाबतीत अनुभव तर असा आहे की मजूर मिळत नाहीत. अशा वेळेस कृषियांत्रिकीकरणाकडे वळायला हवे. जागतिक पातळीवर कृषियांत्रिकीकरणाची उलाढाल एकशेवीस अब्जांवर पोहोचली आहे. अशावेळी संधींचा लाभ घेणे आवश्यक ठरते. कृषी यांत्रिकीकरणाच्या काळात यंत्रे विकसित करून प्रचंड प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठी संधी वाट पहात आहे. आपल्या देशातील कृषीयंत्र उद्योगाने परदेशी बाजारपेठांमध्ये मात्र स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आढळून येते.
युरोप-अमेरिकेतल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शेकडो एकर शेती असते. आपल्याकडे पाच एकरांपेक्षा कमी. आपल्या देशात अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. चीन, जपान, इस्रायलमध्येही आपल्यासारखीच लहान शेते असतात. आपल्याला आता आपल्या परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करायला हवीत.
शेतीतील यांत्रिकीकरणाने वेळ, श्रम, आणि खर्चाची बचत होते. गेल्या वर्षी भारतात कृषियांत्रिकीकरणाचा वेग १० टक्के होता. यंत्रे अवजारे निर्मिती आणि विक्री क्षेत्रात प्रचंड संधी आहेत, हे यातून दिसून येते.
पुण्यात गेल्या महिना- दोन महिन्यात शेती विषयक तसेच डेअरी विषयक अनेक कृषी प्रदर्शने भरली होती. शेतकऱ्यांना यंत्रांची-तंत्रज्ञानाची गरज असल्याचे जाणवून येत होते. या प्रदर्शनात सोलर पंप, गवत बनवायचे यंत्र ( हायड्रोपोनिक), प्रक्रिया यंत्रे होती. काही देशी, काही परदेशी; विशेषत: चिनी. लहान शेतकरी एकत्र येऊन ‘सामुदायिक यंत्रे अवजारे बँक’ सारख्या कल्पना राबवत आहेत. सुशिक्षित कृषी पदवीधर यंत्रे भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करत आहेत.
आज ना उद्या शेतकरी वर्ग गट शेती करू लागेल. शेतकऱ्यांच्या कंपन्या आपल्या मालावर प्रक्रिया करू लागतील. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पुण्यातल्या सोसायटय़ांमध्ये थेट विक्री करू लागले आहेत, पुढच्या काही महिन्यांत या योजनेला अधिक प्रतिसाद मिळेल आणि इतर शहरांमध्येही तो विस्तारेल. हे खरे संक्रमण आहे. यामुळे ग्राहक आणि शेतकरी जोडला जाणे अपेक्षित आहे. यातून विचारांची देवघेव वाढेल. शेतीत पैसा आणि ज्ञान दोन्हींची गुंतवणूक वाढू लागेल. आयटीची माणसे अमेरिकेकडे डोळे लावण्यापेक्षा देशातल्या कृषिमालाच्या ‘ई मार्केटिंग’ कडे व्यवसाय म्हणून पाहू लागतील. शेतात माहिती तंत्रज्ञानाचे लाभ पोहोचू लागतील.
अन्नप्रक्रिया उद्योगाची गोष्टच निराळी. प्रक्रियांअभावी ४० टक्के कृषिमाल- बियाणे, खते, कष्ट करून तयार झालेल्या मालापैकी ४० टक्के माल साठवणुकी आणि प्रक्रियांअभावी वाया जात आहे. ही नासाडी वाचावी, म्हणून त्यावर योग्य प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्यासाठी सुयोग्य आणि परवडण्याजोगे तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे.
काही नावीन्यपूर्ण यंत्रे आणि तंत्रज्ञानांची माहिती पुढीलप्रमाणे –
जगभरात कुठूनही मोबाईल किंवा एसएमएसद्वारे आपली विद्युत मोटार चालू /बंद करणारे उपकरण.
* १५/३०/५० किलोग्राम भाजी टिकवण्याची टोपली. टोपलीत फळे, भाजीपाला, इव्हॅपोरेशन कूलिंगच्या तंत्रज्ञानाने सात ते १२ दिवस टिकवता येतो.
* डाळिंबाची साल काढण्याचे यंत्र – परदेशातले हे यंत्र एक मिनिटात ५६ डाळिंबांची साल काढते.
* गाई-म्हशी पाळणाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात चारा लागतो. जनावरांच्या खाद्याच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारात ठोकळे बनवण्याचे यंत्र विकसित झाले आहे. हे यंत्र स्वयंचलित तसेच मानवी शक्तीने चालवता येते. ठोकळे केल्यामुळे साठवणे सोपे जाते.
* आटोमॅटिक इरिगेशन कंट्रोलर = ठिबक किंवा स्प्रिंकलर बरोबर हे उपकरण बसवून मातीतील ओलावा सेन्सरने तपासून पिकाच्या गरजेप्रमाणे पंप आपोआप चालू बंद करता येतो.
* इन्व्हर्टर ट्रॅक्टर
अनेक संशोधक शेतकऱ्यांनी त्यांना गरज असलेली कृषिउपकरणे स्वत: विकसित करून बाजारात आणलेली आहेत. मात्र यासंबंधित मोठय़ा प्रमाणावर संशोधन होणे आवश्यक आहे.